प्रेस क्लबच्यावतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन
| वेनगाव | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना शुक्रवार, दि.1 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चौक-कर्जत मार्गावरील कर्जत चारफाटा परिसरात घडली.
या घटनेनंतर कर्जत प्रेस क्लब आणि तालुक्यातील पत्रकारांनी संताप व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जत प्रेस क्लब संघटनेकडून निषेध नोंदवण्यात आला असून, या हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रेस क्लबने प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितले आहे, की सहा दिवसांत सदर आरोपींना शोधून काढा, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याप्रसंगी प्रेस क्लबचे गणेश पवार, विजय मांडे, विद्यानंद ओवाल, अनिल गवळे, विलास श्रीखंडे, अजय गायकवाड, मल्हार पवार, ज्ञानेश्वर भागडे, आनंद सकपाल, विपुल माली आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. सुरक्षितेसाठी पत्रकार सुरक्षा कायदा तातडीने लागू करण्याची ठोस मागणी केली आहे.
या प्रकरणात पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपासाची गती वाढवली असून, लवकरच आरोपीचा छडा लावला जाईल.
संदीप भोसले,
वरिष्ठ







