| रसायनी | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या वतीने चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. महेश लांडगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे, मोरेश्वर भोंडवे, चेतन भुजबळ, उदय निरगुडकर, महेश म्हात्रे, आशिष जाधव, मंदार फणसे, अरविंद जगताप, निरंजन टकले, सम्राट फडणवीस आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शैलेश पालकर यांना निर्भिड पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. तर रसायनी येथील पत्रकार राकेश खराडे यांचा सन्मान करुन त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील शेकडो पत्रकार बांधव उपस्थित होते.