पत्रकार विरुद्ध पोलीस क्रिकेट सामन्यात पत्रकार संघ विजयी

| नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल पोलीस संघ विरुद्ध पनवेल पत्रकार संघ यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पत्रकार संघाने बाजी मारत प्रदर्शनीय सामना जिंकला.करंजाडे येथे माजी सरपंच रामेश्‍वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या पुढाकाराने गावदेवी क्रीडा मंडळ करंजाडे येथे मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोकनेते दि. बा. पाटील क्रीडांगणावर करण्यात आले होते. प्रथम फलंदाजी करताना पोलीस संघाने 4 षटकात 20 धावा करून पत्रकार संघाला 21 धावांचे आव्हान दिले होते.

यानंतर पत्रकार संघाकडून फलंदाजीसाठी सलामीला शैलेश चव्हाण आणि रत्नाकर पाटील ही जोडी मैदानात उतरली. शैलेश जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना झेलबाद झाला. त्यानंतर सुरज आणि रत्नाकर या जोडीने जोरदार फटकेबाजीने धावफलक हालता ठेवला, सुरजने चांगली फलंदाजी करत 3 चेंडूत 1 षटकाराच्या सहाय्याने 11 धावा काढल्या, तर रत्नाकरने 6 चेंडूत 1 चौकरसह 9 धावा काढल्या आणि पत्रकार संघाला विजय मिळाला.

Exit mobile version