पत्रकाराची दुचाकी चोरीला

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
रेल्वे स्थानकाबाहेर उभी करून ठेवलेली पोलीस अधिकार्‍याची दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता एका पत्रकाराची दुचाकी चोरण्याचा प्रताप चोरट्यानी केला असून, पोलीस आणि पत्रकार असे स्टिकर चिकटवलेली वाहने चोरून चोरटे एका प्रकारे पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट होत आहे.

नवीन पनवेलमध्ये वास्तव्यास असलेले पत्रकार गुरुवारी (ता.5) एका कामाकरिता रेल्वे स्थानकाबाहेर नवीन पनवेलच्या दिशेला आपली दुचाकी उभी करून खारघर येते गेले होते. दोन तासांनंतर ते परतले असता त्यांनी उभी केलेली दुचाकी त्या ठिकाणी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतरत्र शोध घेतल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने अखेर त्यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाणे गाठत गाडी चोरीला गेल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांना दिली. या घटनेमुळे फक्त काही दिवसांच्या अंतराने पोलीस आणि पत्रकार असे स्टिकर चिकटवलेली वाहने चोरून चोरटे जाणूनबुजून पोलीस प्रशासनाला डिवचण्याचे काम करत आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version