| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यावर्षीही तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे मंगळवार दि.6 जानेवारी 2026 रोजी पत्रकार दिनानिमित्त औषध व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
औषध व फळ वाटप कार्यक्रम भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच दिपकशेठ जाधव व तरुण उद्योजक मंगेश पोळेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ. महेश मेथा, डॉ. दिपक देशमुख, जेष्ठ नेते सिराज परदेशी, माजी सभापती संगीता बक्कम, भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष रचना थोरे, नगरसेविका ममता थोरे, नगरसेवक अजित तारलेकर, सुवर्णक्रांती अर्बन बँकेचे व्यवस्थापक राकेश पडवळ, जेष्ठ पत्रकार अरुण पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर कनोजे, सिद्धेश सत्वे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, कार्याध्यक्ष मजिद हाजिते, उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे, पत्रकार संघाचे प्रवक्ते सचिन देसाई, प्रसिद्धी प्रमुख संतोष गायकवाड, सहसचिव सिद्धी दाखिणकर, रुग्णालयाच्या परिचारिका, कर्मचारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मेथा तसेच प्रमुख अतिथी भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच दिपकशेठ जाधव यांनी पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करीत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर तसेच पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सुरुवातीला माणगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे यांनी पत्रकार संघाच्या गेल्या नऊ वर्षाच्या काळातील कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेत उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पत्रकार मजिद हाजिते, उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे,आजेश नाडकर, सचिन देसाई, संतोष गायकवाड, सिद्धी दाखिणकर आदींसह संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष सहकार्य करीत परिश्रम घेऊन पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.







