मुरुड पालिकेतर्फे पत्रकारांचा सन्मान

Exif_JPEG_420

| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड जंजिरा नगरपरिषदेमार्फत तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी-पंकज भुसे, प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, दिपाली दिवेकर, मनोज पुलेकर, राकेश पाटील, नरेंद्र नांदगावकर, नंदकुमार आंबेतकर, कपिल वेहेले, प्रशांत दिवेकर, संजय वेटकोळी, सतेज निमकर, रुपेश पाटील, सतिष जंजिरकर, ओमकार पोतदार, रुपेश भाटकर तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार आदिंसह मान्यवर उपस्थित होते. भुसे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून 15पत्रकरांना सन्मानपत्र गिफ्ट व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. व शुभेच्छा दिल्या.

यावेळी भुसे, दिपाली दिवेकर, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय करडे आपले मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष -सिराज शेख, उदय खोत, नैनिता कर्णिक, मदन हनुमन्ते यांनी मुरुड मध्ये जलदगतीने होणारा विकासाच्या कामा बद्दल व पत्रकारी करताना अडचणी संदर्भात आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. सूत्रसंचालन -मनोज पुलेकर व आभारप्रदर्शन -राकेश पाटील यांनी मानले.

Exit mobile version