जम्बो मेगा ब्लॉक! मुंबईकरांचे हाल


| मुंबई | प्रतिनिधी |

रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवर (दि.31) मे ते (दि.2) जूनपर्यंत जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला, असून मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा फटका मुंबईसह, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांना बसणार आहे. या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. दरम्यान, डोंबिवलीवरुन ठाण्याला पोहोचण्यासाठी 25 मिनिटे लागतात. मात्र, या ब्लॉकमुळे प्रवाशांना डोंबिवलीहून ठाण्याला पोहोचायला अर्धा तास जास्त लागला. म्हणजेच डोंबिवली-ठाणे प्रवासाला तब्बल 50 मिनिटे लागल आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी लालपरी धावली आहे. मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा एसटी बसेस सोडण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द असल्याने पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी ४० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर प्रवाशांचा ताण पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत.  मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून 40 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
आजपासून ठाण्यात मेगा ब्लॉक 
स्थानक - कळवा ते ठाणे
मार्ग - अप-डाउन धीमा आणि अप जलद
वेळ - 31 मे मध्यरात्री 12.30 ते 2 जून दुपारी 3.30
Exit mobile version