किशोर, किशोरी गट कबड्डी निवड चाचणी

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने दि. 21 व 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत किशोर, किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहे. यंदापासून मुंबई शहराचे पूर्व विभाग व पश्चिम विभाग असे दोन संघ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून निवडण्यात आलेले संघ दि.5 नोव्हेंबर पासून मानवत-परभणी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरच्या पूर्व व पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या सर्व संघानी शनिवार दि.21 ऑक्टोंबर रोजी दुपारी 03-00 वा स्पर्धेकरीता उपस्थित रहावे. असे संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसार माध्यमातून सर्वाँना कळविले आहे.

Exit mobile version