। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगडा जिल्ह्याचा ज्युनियर (16 वर्षांखालील) मुलांचा क्रिकेट संघ निवडण्यासाठी 1 व 2 एप्रिल रोजी खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील रिलायन्स कॉलनीतील अंबानी स्कूल मैदानावर निवड चाचणी घेतली जाणार आहे.
या चाचणीतून रायगड जिल्ह्याचा 16 वर्षांखालील मुलांचा संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत सहभागी होईल, अशी माहिती रायगडा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या खेळाडूंनाच या निवड चाचणीत भाग घेता येणार असून त्यासाठी आधार कार्ड आणि वयाचा दाखला सादर करावा लागलणार आहे.
निवड चाचणीच्यावेळी खेळाडूंनी क्रिकेटचा सफेद गणवेश परिधानकरून आणि स्वतःचे क्रिकेट साहित्य घेऊन 1 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता लोधिवली येथील मैदानावर हजर राहायचे आहे. निवड चाचणी शुल्क 200 रुपये आकारण्यात येणार असून 1 सप्टेंबर 2008 नंतर जन्मलेले खेळाडूच यात भाग घेऊ शकणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रकांत मते (09822836442), प्रशांत ओक (09822422676), किरीट पाटील (08898015285) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







