मान्सूनची फक्त हुलकावणी; तापमान पारा 35 च्या वर

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
भारतीय हवामान खाते यांनी वेळे आधी येणार्‍या मान्सूनचा अंदाज जवळजवळ रायगडात तरी फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. खाजगी स्कायमेट संस्था यांनी भारतीय हवामान विभागा कडून केरळ मध्ये मान्सून 3 दिवस आधी येणार असल्याची जी वर्दी दिली होती त्यामध्ये कोणताही दम नसल्याचे खाजगी हवामान संस्था स्कायमेट यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर देखील हा मेसज आलेला आहे. अजूनही रायगडात उष्णतेमुळे नागरिकांची काहिली होत असून तापमानाचा पारा 35 च्या वर पोहचला आहे. यंदा 7 जून पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार अशा बातम्या पसरल्या होत्या. प्रत्यक्षात 1 जून येऊन देखील पावसाचा थांग पत्ता नव्हता. पोलादपूर, रोहा, माणगाव, महाड, पाली, खोपोली, पेण तालुक्यात मात्र उष्णतेच्या झळा आधिक मोठया प्रमाणात जाणवत आहेत. रायगडात काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्याचे वृत्त असून पावसाची गरज आहे. पावसाचा हा लपंडाव सुरू असून लवकरच वरुण राजाचे आगमन होईल असे अनुमान बुजुर्ग मंडळीनी बुधवारी व्यक्त केले आहे.

Exit mobile version