| अलिबाग | प्रतिनिधी |
बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान रायगड (RSETI) मार्फत ज्युट प्रॉडक्ट उद्यमी हे मोफत 14 दिवसीय प्रशिक्षण दि. 29 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान रायगड (RSETI) मध्ये आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणासाठी रोहा तालुक्यातील झोळंबे या गावातील 31 महिलांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणामध्ये ज्युटपासून विविध वस्तू बनविणे या विषयाचे सखोल ज्ञान तसेच उद्योजकता विकास, मार्केटिंग, बँकिंग, आर्थिक साक्षरता यासोबत प्रकल्प अहवाल या सर्व बाबींवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी परीक्षा घेण्यात आली, प्रशिक्षणार्थीना संबोधताना RSETI चे संचालक सुमितकुमार धानोरकर म्हणाले की, तुम्ही दिलेल्या वेळेचा व RSETI च्या प्रयत्नाचे यश म्हणजे आपण लवकर आपल्या व्यवसायाची सुरुवात करावी यासाठी जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया व स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान रायगड (RSETI) आपल्या सोबत सदैव असेल, असे यावेळी प्रशिक्षणार्थीना आश्वस्त करण्यात आले. व सर्व महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्युट प्रॉडक्ट उद्यमी प्रशिक्षण
