एंजेल ब्रोकिंगच्या प्रमुख तंत्रज्ञान अधिकारीपदी ज्योतिस्वरुप रायतुरकर

एंजेल ब्रोकिंगला फिनटेक क्षेत्रात मोठी प्रगती करण्याची इच्छा असल्याने, त्यांनी ज्योतिस्वरुप रायतूरकर यांची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदावर नियुक्ती केली आहे. एंजेल ब्रोकिंगने ब्रोकिंग सेवांपासून म्युच्युअल फंड, विमा, कर्ज इत्यादी सर्व वित्तीय गरजांचे निरसन करण्यासाठी अशी एकछत्री ब्रँड म्हणून ओळख दर्शवण्यासाठी एंजेल वन हे रिब्रँडिंग केले असताना, ज्योतिस्वरुप यांची नियुक्ती झाली आहे.

कंपनीत तंत्रज्ञान विकास आणि इंजिनिअरिंग टीमचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केलेल्या ज्योतिस्वरुप यांना हाय व्हॉल्यूम बीटूसी तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट ट्रान्सफॉर्मेशनमधील नेतृत्वाचा दोन दशकांचा अनुभव आहे. यामुळे वित्तीय सेवांमधील भविष्यातील विस्तार योजनांना आणखी मूल्य प्रदान केले जाईल.

वॉलमार्ट लॅब्स येथे एक यशस्वी कारकीर्दीनंतर ते एंजेल ब्रोकिंगच्या टीममध्ये सहभागी होतील. वॉलमार्ट येथे त्यांनी कंपनीच्या जागतिक बाजारपेठेचे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि पुढील पिढीच्या हायपर पर्सनलाइज्ड अॅपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. वॉलमार्टच्या आधी, ज्योतिस्वरुप यांनी मिंट ((इंट्यूट्सचे मनी मॅनेजिंग अॅप) आणि गोईबिबो येथे विविध तंत्रज्ञानातील वरिष्ठ पदांवर नेतृत्व केले. त्यांनी विंडोज प्लॅटफॉर्मवर मायक्रोसॉफ्ट आणि मल्टीमीडिया फ्रेमवर्कवर सॅमसंग येथेही काम केले आहे.

ज्योतिस्वरुप यांनी वॉलमार्ट लॅब्स आणि गोईबिबो येथे चीफ आर्किटेक्ट म्हणून तर 8केपीसी येथे डायरेक्टर इंजिनिअरिंग म्हणून काम पाहिले. त्यांनी भौगोलिक मर्यादांपुढील अनेक टीमचे नेतृत्व केले असून सक्षम नेतृत्व व मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट अभियांत्रिकीची संस्कृती जोपासली आहे.

ज्योतिस्वरुप यांनी इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, शिकागो, येथून कंप्यूटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी एनआयटी, नागपूर येथे कंप्यूटर सायन्समध्ये पदवी आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

Exit mobile version