। पोयनाड । वार्ताहर ।
झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्यदिव्य कबड्डी स्पर्धेत श्रीगणेश दिवलांग संघाने बाजी मारत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात म्हसोबा पेझारी संघाला पराभूत करत श्रीगणेश दिवलांग संघाने कै.प्रकाश मालोजी चवरकर स्मृतिकचषक व कै.मिलिंद रवींद्र चवरकर यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 15 हजार देऊन गौरविण्यात आले. दिवतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हसोबा पेझारीचा संघ त्यांना कै. शांताबाई त्रिंबक पाटील व कै. सूर्यकांत बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 10 हजार व चषक,तृतीय क्रमांक पटकावला तो नवजीवन पेझारी संघाने त्यांना अखिल संजय म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 7 हजार व चषक तर स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला चैलेंजर्स कपोरचा संघ त्यांना कल्पेश चंद्रकांत पवार यांच्याकडून रोख रक्कम 7 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रीगणेश दिवलांग संघाचा अमीर धुमाळ, उत्कृष्ठ चढाई चैलेंजर्स कोपर संघाचा कुणाल पाटील उत्कृष्ठ पक्कड नवजीवन पेझारी संघाचा मकरंद पाटील तर पब्लिक हिरो म्हणून म्हसोबा पेझारी संघाचा खेळाडू मितेश पाटील यांना सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 32 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उदघाटन पोयनाड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुलजी अतिग्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर,अमित नाईक, भूषण चवरकर, सुनिल पाटील, अजित चवरकर, किशोर जैन, शैलेश पाटील,महादेव जाधव, उमाजी काळे,अन्वर बुराण,किशोर तावडे दिपक साळवी नंदकिशोर चवरकर योगेश चवरकर सुजित साळवी, मनोज भगत ,कुलदीप पाटील, धर्मेश पाटील, भरत जैन, निहाल अग्रवाल, अक्षय अग्रवाल, पंकज चवरकर, इम्रान बुराण, अँड पंकज पंडित सह विभागातील सामाजिक,क्रीडा,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
झुंझार पोयनाड आयोजित कबड्डी स्पर्धा; श्रीगणेश दिवलांग अंतिम विजयी
