कबड्डीपटूची गोळी झाडून हत्या

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंजाबमध्ये आणखी एका कबड्डीपटूची हत्या झाली आहे. मंगळवारी रात्री पतियाळामध्ये पंजाब विद्यापीठाच्या गेट समोर चकमक झाली. यावेळी धरमिंदर सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.पंजाबमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी धरमिंदरने शिरोमणी अकाली दलाची साथ आम आदमी पार्टीसाठी प्रचार केला. मंगळवारी संध्याकाळी दौन कालान आणि थेरी गावातील गावकरी विद्यापीठामध्ये भिडले. विद्यापीठाबाहेर एक धाबा आहे, तिथे दोन्ही गट बैठकीसाठी आले होते. धरमिंदर आपल्या गावातील गावकर्‍यांच प्रतिनिधीत्व करत होता. चर्चा सुरु होती. तितक्यात कोणीतरी गोळी झाडून धरमिंदरची हत्या केली.

Exit mobile version