खेड तालुक्याचा कबड्डी संघ जाहीर

। खेड । प्रतिनिधी ।
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने चिपळूण तालुक्यातील कुंभाली येथे 36 व्या किशोर – किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी तालुक्यातील संघांची निवड करण्यात आली आहे. किशोरी संघाच्या कर्णधारपदी श्रावणी जाधव तर किशोर संघाच्या कर्णधारपदी सुरज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

या दोन्ही गटातील खेळाडूंना तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे यांच्या हस्ते पोशाखाचे वाटप करण्यात आले. यासाठी माजी उपनगराध्यक्ष कुंदन सातपुते, माजी सभापती सुप्रिया पवार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सचिव रवींद्र बैकर, कार्याध्यक्ष संमद बुरोंडकर, कोषाध्यक्ष दाजी राजगुरू, उपाध्यक्ष महेश भोसले, सहसचिव शरद भोसले, सुखदेव पवार, सुभाष आंबेडे, अमोल दळवी, मंगेश खेडेकर, दीपक यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version