कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

34वी किशोर/किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी

| पुणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असो.चा सहकार्याने व लोकसेवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने ’34व्या किशोर/किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, फुलगाव, ता. हवेली, पुणे येथील पटांगणात दिनांक 24 ते 28 जानेवारी या कालावधीत या स्पर्धा होतील. लोकनेते स्व. गिरीश बापट यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहेत. याकरिता मॅटची 6 क्रीडांगण तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून निवडण्यात आलेले संघ 34व्या राष्ट्रीय किशोर/किशोरी गट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल. परभणी येथे झालेल्या 33व्या किशोर/किशोरी गट स्पर्धेत मुलात परभणी विजेते तर हिंगोली उपविजेता ठरले होते. मुलीत सांगली विजेते, तर परभणी उपविजेता ठरले होते. स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असून त्याची गटवारी राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी आज सर्व प्रसार माध्यमांकरीता जाहीर केली. ती खालील प्रमाणे.

किशोरी गट :
अ गट 1)सांगली, 2)रत्नागिरी, 3)अहमदनगर.
ब गट 1)परभणी, 2)रायगड, 3)लातूर, 4)पिंपरी – चिंचवड.
क गट 1)मुंबई उपनगर पूर्व, 2)उस्मानाबाद, 3)धुळे, 4)ठाणे शहर.
ड गट 1)नाशिक शहर, 2) पालघर, 3) जालना, 4) मुंबई शहर पूर्व.
इ गट 1)पुणे ग्रामीण, 2)नंदुरबार, 3)औरंगाबाद, 4) नाशिक ग्रामीण.
फ गट 1)मुंबई शहर पश्चिम, 2)ठाणे ग्रामीण, 3) नांदेड, 4)पुणे शहर.
ग गट 1)सिंधुदुर्ग, 2)सोलापूर, 3)हिंगोली, 4) मुंबई उपनगर पश्चिम.
ह गट 1)कोल्हापूर, 2)सातारा, 3) जळगांव, 4)बीड.

किशोर गट :
अ गट 1) परभणी, 2) बीड, 3) जालना.
ब गट 1) हिंगोली, 2)लातूर, 3) सोलापूर, 4)पिंपरी – चिंचवड.
क गट 1) नंदुरबार, 2)उस्मानाबाद, 3) पालघर, 4)ठाणे शहर.
ड गट 1) अहमदनगर, 2) जळगांव, 3) रायगड, 4) नाशिक ग्रामीण.
इ गट 1)पुणे ग्रामीण, 2) ठाणे ग्रामीण, 3) सातारा, 4) मुंबई उपनगर पश्चिम.
फ गट 1) कोल्हापूर, 2) औरंगाबाद, 3) सांगली, 4) मुंबई शहर पूर्व.
ग गट 1) मुंबई शहर पश्चिम, 2) नाशिक शहर, 3) सिंधुदुर्ग, 4) पुणे शहर.
ह गट 1) मुंबई उपनगर पूर्व, 2) रत्नागिरी, 3) धुळे, 4) नांदेड.

Exit mobile version