‘त्या’ ऑडिओ क्लिपचे मूळ डिव्हाईस कदमांकडे!

| मुंबई | प्रतिनिधी |

500 कोटींच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. या क्लिपचे मूळ डिव्हाईस शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे असून, त्यांच्याकडूनच क्लिपचा स्रोत घ्यावा, असे जरांगे यांनी म्हटले आहे. रामदास कदम यांनी आपल्याआधी दोन तास ही क्लिप वाजवली होती, असाही दावा त्यांनी केला. दरम्यान, आपल्या विरोधात बोलण्यासाठी 30 ते 35 जणांची टोळी तयार करण्यात आली असून, त्यांना पूर्ण ताकद दिली जात आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे करत होते, आता एकनाथ शिंदे हे करत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

Exit mobile version