कळंबोलीचे कुस्ती स्पर्धेत वर्चस्व

| पनवेल | प्रतिनिधी |

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा नावडे येथील प.जो. म्हात्रे विद्यालयात पार पडल्या. स्पर्धेत एकूण 215 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या कुस्ती स्पर्धेत कळंबोलीतील पोलीस मुख्यालय कुस्ती संकुलातील कुस्तीपटूंनी 16 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 21 पदकं पटकावली आहेत. त्यात खुल्या गटात अर्णव शेजुळ (35 किलो), सोहम ढगे (38 किलो), साहिल घुगे (41 किलो), अनिरुद्ध बंडगर (48 किलो), स्वराज पाटील (52 किलो), यश घुगे (62 किलो), वेद तांबे (57 किलो), वेदांत येळकर (68 किलो), स्वप्निल लावंड (75 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले असून अनिश पाटील (35 किलो) व पार्थ गुंड (52 किलो) यांनी रौप्यपदक पटकावले आहे. तसेच, 17 वर्षांखालली गटात शिवम सत्रे (48 किलो), मानव यादव (51 किलो), सिद्धार्थ भोपी (55 किलो), वेदांत पाटील (60 किलो), निखिल यादव (65 किलो), ओम शिंदे (71 किलो) व संस्कार शिंदे (80 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच, आदर्श नाळे (55 किलो) व अवधूत पाटील (65 किलो) यांनी रौप्यपदक पटकावले असून हर्षल नाईक (45 किलो) व संस्कार कदम (80 किलो) यांनी कांस्यपदक पटकावले आहे. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, राखीव पोलीस निरीक्षक शांताराम वाघमोडे व क्रीडा प्रमुख तथा प्रशिक्षक संपत्ती येळकर यांनी कुस्तीगिरांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version