शेकापच्या पाठपुराव्याला यश
सिडकोकडून कामाला सुरुवात
| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीतील पाण्याची टाकी ते सेंट जोसेफ शाळेपर्यंत पाईपलाईन बदलण्यासाठी मुख्य रस्ता खोदण्यात आला होता. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले, मात्र रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शेकाप नगरसेवक रवींद्र भगत यांनी अनेक वेळा पाठपुराठा केल्याने रस्त्याच्या कामास कामास सुरुवात करण्यात आली.
कळंबोलीतील एलआयजी भागात सेक्टर 2 येथील रहिवासी आणि पादचारी वाहनचालकांना नादुरुस्त रस्ता असल्याने या रस्त्यातून वाट काढावी लागत होती. मात्र, आता नागरिकांना सिडकोच्या नियोजनशून्य कामाचा फटका सहन करीत या रस्त्यावरुन चालावे लागत होते. रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांना या रस्त्यावर ये-जा करण्यास सोयीचे होणार आहे. त्यामुळे नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार मानण्यात येत आहेत.
कळंबोलीतील पाण्याच्या टाकीपासून ते सेंट जोसेफ येथील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेविका प्रिया भोईर, शेकाप कळंबोली महिला अध्यक्षा सरस्वती काथारा, संजय म्हात्रे, सूरज सुपवते, संदीप पाटील, संजय सरगर, अतुल जगदाळे, सूरज जाधव, प्रकाश भोसले, धीरज सेप, सूरज सेठ आदी मान्यवर उपस्थित होते.