। हमरापूर । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील कळवे गाव व शाळा लवकरच डिजिटल होणार होणार असून सरपंचांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. असा उपक्रम सुरू करणारी कळवे ही पेण तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे.
सध्याचे युग हे डिजिटल असून तंत्रज्ञान पुढे गेले आहे. याचाच उपयोग करून घेत कळवे ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव व रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वित्त आयोगातून हा डिजिटल उपक्रम आम्ही सुरू करणार असून यामुळे संपूर्ण गावाचा नकाशा दिसत असून प्रत्येक घर हे गुगल मॅपवर दिसणार आहे. पेण तालुक्यातील असा उपक्रम सुरू करणारी कळवे ग्रामपंचायत ही पहिलीच असल्याची माहिती सरपंच सतीश पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. या उपक्रमाचा शुभारंभ कळवे सरपंच सतीश पाटील, उपसरपंच जयमाला पाटील, अंकिता पाटील, राजश्री पाटील, ग्रामसेविका शामल मोकल, प्रकाश ठाकूर, मनोहर पाटील, अल्पेश म्हात्रे, सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.







