कलिंगडचे पीक धोक्यात

| पेण | प्रतिनिधी |
गेल्या आठवडयात अवकाळी तुरलक पाऊस पडला आणि कलिंगडाच्या पीकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला. मात्र, काल पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने कलिंगडाची शेती करणार्‍या बळीराजाचे कंबरडेच मोडून टाकले. पेण तालुक्यातील जिर्णे गावच्या हद्दीत असलेल्या ताडमाळ या गावामध्ये विश्‍वास बबन पवार यांनी कलिंगडाची शेती केली आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे पिकावर काय परिणाम झाला. याबाबत माहिती घेण्यासाठी आमची टीम पोहचली असता विदारक दुःख समोर आले आहे.

गेली 14 वर्ष विश्‍वास पवार हे कलिंगडची शेती करत आहे. परंतू, यावर्षी वारंवार निसर्गात होणारे बदल कलिंगड शेतीसाठी हानिकारक असल्याचे मत मांडले आहे. दरवर्षी खर्च वजा करता कलिंगडच्या शेतीमध्ये एक ते दीड लाखाचे उत्पन्न होते. परंतू यावर्षी खर्च वसूल होताना नाकीनउ होणार आहे. गेल्या आठवडयात तुरलक पाउस पडला त्यामुळे फळाला आलेले पीक करप्या रोगाच्या विळख्यात अडकला असून फळ लहान लहान असतानाच ती आपोआपच फूटत आहेत. तसेच काल पडलेल्या पावसामुळे पूर्ण पीक झोडपूनच काढला सध्या फळाची वाढ ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही तसेच जरी त्याला खत घालायचा प्रयत्न केल्यास फळ गळून पडेल. अस देखील विश्‍वास याने सांगितले.

सधारणताः पाउण एकरमध्ये अडीच हजार आळयांची लागवड विश्‍वासने केली असून आत्तापर्यंत पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला आहे पुढे अजून दहा हजाराच्या आसपास खर्च अपेक्षीत आहे. सध्या बाजारभाव बारा रुपये किलो आहे. परंतू, जर भाव घसरल्यास पूर्ण तोटा सहन करावा लागणार आहे. अडीच हजार आळयांमधून सात ते आठ टन कलिंगड निघणे अपेक्षीत आहे. परंतू, अवकाळी पावसामुळे पुर्णताः कलिंगड पीकाची वाताहात झाली असून तालुक्यातील कलिंगड पीक घेणारे शेतकरी पूर्ते हवालदिल झालेले आहेत.

Exit mobile version