उन्हाळ्यातील आरोग्यवर्धक फळ कलिंगड

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात चांगल्या आहारावर जास्त भर देतो. मात्र, त्याचबरोबर उन्हाळ्यात अजून एक फळ जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे ते म्हणजे कलिंगड.

वेलवर्गातले आरोग्यवर्धक पीक कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आरोग्यवर्धक, व्याधीशामक, स्वदिष्ट असून जाम जेली, सौस निर्मितीत उपयुक्त. सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे अलीकडे शेतकरी आता उच्च तंत्राद्यानच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत. कलिंगडाची लागवड जानेवारी महिन्यात केली जाते. त्यामुळे कलिंगडाची फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात.

कलिंगडच्या जाती
शुगर बेबी
हे २-२” किलो वजनाची फळे देणारी, अतिशय गोड, लाल आणि बारीक बियांची ११ ते १३ टक्के साखरउतारा असणारी हि जात विक्रीयोग्य आहे. फक्त ७५ ते ८० दिवसात हि फळं तयार होतात.

अरका माणिक
हे लम्बवर्तुळाकार पांढरट पट्टे असणारी ५ ते ६ किलो वजनाची फळं, गर्द लाल रवेदार गार आणि १२ ते १५ टक्के साखर असणारी हि जात वाहतुकीस आणि साठवणीस योग्य आहे हि १०० दिवसात तयार होते.

यामोटो
हे जपानी जात ४ ते ७ किलो वजनाची फळे देणारी, ९० दिवसात तयार होणारी, गर गोड, बारीक बियांची उत्पादनक्षम अशी जात आहे.

कलिंगड खाण्याचे फायदे
– कलिंगडमध्ये जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते.
– कलिंगड नियमीत खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
– उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.
– कलिंगड खाल्लाने गॅस आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळू शकते.उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे.
– उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जा भरपूर वेळ टिकून राहते.

गेली ४२ वर्षापासून कलिंगड विक्री व्यवसाय करत आहे.गोल्डन कलिंगड या जातीची कलिंगडे मंडणगड वरून विक्रीसाठी आणली जातात.या वर्षी उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे कलिंगडची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. – उमेश मढवी विक्रेते, राज कलिंगड पाली

Exit mobile version