। पनवेल । वार्ताहर ।
इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी कल्पना विलास कोठारी यांची निवड झाली आहे. पनवेलच्या तथास्तु हॉल येथे पार पडलेल्या क्लबच्या पदग्रहण समारंभात 2024-25 या वर्षाकरिता ही निवड करण्यात आली आहे. कल्पना विलास कोठारी यांच्या अध्यक्षपदाखाली झालेल्या नवीन कार्यकारणीमध्ये सेक्रेटरीपदी उलका धुरी, उपाध्यक्षपदी भूमिका परमार, खजिनदारपदी ममता राजीवन, आयसोपदी शितल वाळंजू, एडिटरपदी दिपाली आडमुठे, क्लब पत्रव्यवहारपदी अर्चना राजे तर सल्लागार समितीमध्ये सुनिता आडमुठे, साधना धारगळकर, स्नेहल वाडकर, लता शाह, विद्या चव्हाण, अंजू गांधी आणि आयपीपी शितल कांडपिळे यांची निवड करण्यात आली आहे.