। पनवेल । वार्ताहर ।
ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली असून मंगळवारी (दि.19) आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते
कल्पिता किशोर पिंपळे यांनी यापूर्वी सर्वप्रथम 2010 ते ऑगस्ट 2014 यादरम्यान अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर ऑगस्ट 2014 ते जून 2017 यादरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जुलै 2017 ते डिसेंबर 2020 यादरम्यान नगरपरिषद प्रशासन संचालनालय सहाय्यक संचालक पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 23 डिसेंबर 2020 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि निर्भीडपणे निभावली.
पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी कल्पिता पिंपळे
