सुतारवाडीमधील कल्याणी, स्वप्निल यांची मुंबई पोलीस दलात निवड

। सुतारवाडी । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील सुतारवाडी या ग्रामीण भागातील कल्याणी काशिनाथ मानकर आणि स्वप्निल सुधीर घाडगे यांची पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी नियुक्ती होऊन ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. याचा संपूर्ण गावाला अभिमान आहे. पोलीस कॉन्स्टेबल कल्याणी मानकर ही सध्या घाटकोपर येथे झोन 7 एसबीआय या विशेष शाखेमध्ये कार्यरत असून स्वप्निल घाडगे हा राज्यमंत्री सदा सरवणकर यांच्या येथे कार्यरत आहे.

कॉन्स्टेबल कल्याणी मानकर हिने प्रहार अकॅडमी कल्याण या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केले होते. तिने द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी येथे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून ती पुढे शिकली आणि पोलीस दलातील प्रशिक्षण घेतले. घरात तीन बहिणी आई वडील आणि एक भाऊ आहे. तिने सामान्य परिस्थितीतही मोठ्या कष्टाने चिकाटीने, लहानपणापासूनचे पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले. तर कॉन्स्टेबल स्वप्निल सुधीर घाडगे यांनी ही प्रतिकूल परिस्थितीत सुतारवाडी हायस्कूलमध्ये आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेऊन पोलीस दलातील अवघड प्रशिक्षण पूर्ण करून आपले स्वप्न पूर्ण केले. आज मोठ्या अभिमानाने ग्रामीण भागातील हे दोघेही आपल्या आई-वडिलांसह शाळेचे, गावाचे, तालुक्याचे व रायगड जिल्ह्याचे नावलौकिक करत आहेत.

Exit mobile version