। अलिबाग । वार्ताहर ।
सन 2022 ते सन 2027 सालाकरीता झालेल्या कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी (मर्या) पनवेल संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात 23 फेबु्रवारी रोजी सदर निवडणूक घेण्यात आली. पुढील 5 वर्षाकरीता अध्यक्षा म्हणून मालती आंग्रे तर उपाध्यक्षा म्हणून विभावरी कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अपर्णा पेंडसे, पूर्वा खेडेकर, पूनम बांदोडकर, उर्मिला वंजारी, अर्चना कुलकर्णी, चित्रा मानकामे, वृंदा वत्सराज, मनिषा विसपूते, सुषमा जांभळे संचालिका म्हणून संचालकांची बिनविरोध निवड झाली.







