परिष पाटील, श्रीकांत पाटीलची बाजी
| उरण | वार्ताहर |
कोप्रोली म्हात्रे जिम येथील आशुतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (दि.11) झालेल्या कामोठे महोत्सव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत कोप्रोली गावाचे सुपुत्र परिष प्रकाश पाटील यांनी 2022 चे कामोठे महोत्सव विजेतेपद पटकाविले. तर, कळंबुसरे गावातील श्रीकांत कुमार पाटील यांनी 65 वजनी गटात ग्रुप विजेतेपद पटकाविले. दोन्ही स्पर्धकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
याआधी त्यांनी पेण महोत्सव येथेदेखील द्वितीय क्रमांक पटकाविले होते. या यशाने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शक कोप्रोली म्हात्रे जिमखान्यातील आशुतोष म्हात्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यात आली. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले