जेएसडब्ल्यूकडून कांदळवनाची तोड; अधिकार्‍यांचा पाहणी दौरा रद्द

| पेण | वार्ताहर |
जेएसडब्ल्यू कंपनीने अनधिकृतरित्या कादंळवनांची तोड करून ते गाडून टाकल्याची तक्रार तुषार मानकवळे यांनी केली हेाती. त्या अनुशंगाने एस.एस.डूंबरे वन क्षेत्रपाळ वडखळ यांनी संयुक्तपणे तहसिल, भूमिअभिलेख, पोलिस, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी, तक्रारदार, यांचा स्थळ पाहणी पंचनाम्याचा कार्यक्रम ठेवला होता. घटनास्थळी तक्रारदार वनखात्याचे अधिकारी पोलीस व कंपनीचे अधिकारी पोहोचले मात्र तहसिल कार्यालयातील महसुल खात्याचा कुणीही कर्मचारी अथवा अधिकारी तसेच भूमिअभिलेख कार्यालयाचे कुणीही अधिकारी हजर नसल्याने हा पाहणी दौरा तात्काळ रद्द करावा लागला.

यावेळी वन क्षेत्रपाळ एस.एस.डूंबरे यांनी सांगितले की आतापर्यंत चार वेळा हा पाहणी दौरा रद्द करावा लागला आहे. त्यामुळे कळत न कळत शासनाचा सुध्दा नुकसान होत आहे. पुढील स्थळ पाहणी पंचनाम्याच्या वेळेला इतर कार्यालयातील अधिकारी आले नाही तर मी माझा रिपोर्ट माझ्या वरिष्ठांना देउन मोकळी होईल. या पाहणी दौर्‍यासाठी आशिष वर्तक, जय पाटील, डी.एस.पाटील वनपाल, उपपोलिस निरिक्षक अतुल मांडके, यांच्यासह कंपनीचे अधिकारी देखील हजर होते.

Exit mobile version