| पेण | प्रतिनिधी |
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या भोंगल कारभाराचा फटका महामार्गाच्या लगतच्या गावांना आजही भोगावा लागतो. गेली 3 वर्ष पावसाळयात कांदळे, कांदळेपाडा या गावांना पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे. याला जबाबदार महामार्गाचा भोंगल कारभार असल्याने त्रस्त ग्रामस्थांच्या वतीने कांदळेचे माजी सरपंच मुरलीधर भोईर यांनी लोकसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
प्रसार माध्यमांशी बोलताना भोईर यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षात कित्येक वेळा तहसिल कार्यालयात, प्रांत कार्यालयात, जिल्हा अधिकारी कार्यालयात वेळोवेळी निवेदन देउन ही फक्त अधिकारी वर्गाने बोलवन केले. परंतु, आजही कांदळे आणि कांदळेपाडा येथे जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता उचेडे पासून हॉटेल साईलालापर्यत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतातच. तसेच चुकीच्या पध्दतीने बायपास मोरीचे काम केल्याने पावसाळयात पाण्याचा निचरा होत नाही. पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचा मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु, त्याचे प्रशासनाला काही घेणे देणे नाही. जर या निवडणूकीच्या अगोर प्रशासकानी योग्य ती कारवाई करून सर्व्हिस रस्ता तयार केला नाही तर कांदळे व कांदळेपाडा ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार असे त्यांनी सांगितले.