शीख समुदायाच्या अपमानाप्रकरणी कंगनावर गुन्हा दाखल

। चंदीगढ । वृत्तसंस्था ।
शीख समुदायासंदर्भात अपमानजनक वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रानावत हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने आपल्या वक्तव्यात शीख समुदाय हा खालिस्थानी असल्याचा उल्लेख केला होता. ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. भारताला स्वातंत्र्य 1947 रोजी नव्हे तर 2014 ला मिळालं असं म्हणून आपल्या अकलेचे तारे तोडणार्‍या अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.
कंगना विरुद्ध एका जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने संपूर्ण शीख समुदायाचा खलिस्तानी दहशतवादी म्हणून उल्लेख केला होता, तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या बुटाखाली डासांसारखे चिरडल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, कंगना रानौतला नुकतच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची धनी होत असते. काही दिवसांपूर्वी तिने भारताच्या स्वातंत्र्यावरू केलेल्या वक्तव्यामुळे देखील तीला टीकेचा मोठा सामना करावा लागला होता. त्यावेळी अनेकांनी तिचा पद्मश्री परत घेण्याची मागणी केली होती.

Exit mobile version