वरदविनायकाच्या दारात भक्तांची मांदियाळी
| पाताळगंगा | वार्ताहर |
अष्टविनायकांपैकी असलेले महड गावातील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी खालापूर , चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी या परिसरातील हजारो भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने सुंदर अशी मनमोहक रांगोळी वरदविनायक फुल व कडधान्ये रांगोळी मंडळ यांच्या माध्यमातून काढण्यात आली होती.
या रांगोळीसाठी कपिल पितळे बदलापूर, संतोष भोर, रवींद्र झवरे, रोहित प्रभु- चांभार्ली, वरद पवार-कल्याण, दिलीप पै. पनवेल यांनी अर्थसहाय्य केले. वातावरण उष्णता जरी वाढली असली तरी सुद्धा अनेक भक्तांनी या बाप्पाचे दर्शन घेतले.
या रांगोळीमध्ये श्री राम तसेच विठ्ठलांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रवि आचर्य-नेरळ, मंगेश देशमुख- माणकिवली, तुलशिराम ठोंबरे-टेभरी, सचिन पाटील-कलोते, उत्तम जगदाळे-पनवेल, किशोर म्हात्रे-बदलापूर, स्मिता म्हात्रे-बदलापूर,अतुल तट्टू – महड,साक्षी देशमुख,स्नेहल देशमुख, श्रेया देशमुख-माणकिवली, स्वरा पाटील-जीवन ठोंबरे, भरत ठोंबरे , तन्मय पाटील-कलोते यांनी साकरलेली होती. यामध्ये सप्त कलर्स तांबडा, नारंगी, पिवळा,हिरवा, जांभळा, निळा, पांढरा लाल आदी रंगांचा वापर करण्यात आला होता. कणी, साबूदाने, काळा तीळ अशा एकूण 100 किलो वस्तूंचा समावेश करण्यात आला होता.







