कपिल पाजींचा अश्‍विनवर कौतुकाचा वर्षाव

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्‍विन याने श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यात दिग्गज कपिल देव यांचा विक्रम मागे टाकला. अष्टपैलू कपिल देवयांनी यांनी कसोटीत 434 विकेट घेतल्या आहेत. अश्‍विनने त्यांना ओव्हर टेक करत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजामध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. या कामगिरीनंतर खुद्द कपिल पाजींना अश्‍विनवर कौतुकाचा वर्षाव केला. एवढेच नाही तर त्याला खास गिफ्टही दिले.

रविचंद्रन अश्‍विन याने यासंदर्भातील खुलासा केलाय. कपिल देव यांनी अभिनंद केले. त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात एक नोट लिहून पुप्षगुच्छ पाठवल्याचे अश्‍विनने सांगितले. रविवारी अश्‍विनने कपिल देव यांचा 434 विकेट्सचा विक्रम मागे टाकला होता. कपिल देव यांनी 131 कसोटी सामन्यात हा पल्ला गाठला होता. अश्‍विनने अवघ्या 85 कसोटीत कपिल पाजींना मागे टाकले.

अश्‍विनने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की, कपिल पाजी खूप प्रेमळ आहेत. त्यांनी पुष्पगुच्छ घरी पाठवला आहे. त्यांनी माझे अभिनंदन केले. त्यांनी लिहिलेल्या खास नोटचाही त्याने उल्लेख केलाय. कपिल देव यांनी 1994 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी ते कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते. त्यानंतर आतापर्यंत 9 गोलंदाजांनी त्यांना ओव्हरटेक केले आहे. कपिल देव यांनी रविचंद्रन अश्‍विनचे अभिनंदन करताना त्याच्यासाठी नवे टार्गेटही दिलं आहे. 500 चे लक्ष तो सहज पार करेल, त्याने यावर फोकस करावा, असे कपिल पाजींनी म्हटले आहे.

Exit mobile version