| पनवेल| प्रतिनिधी |
करंजाडे वसाहतीतील सेक्टर 6 येथील सुमारे 150 सोसायट्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सिडको पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनीच्या तांत्रिक तपासणीचे काम सुरू केले आहे. सिडकोकडून करंजाडे वसाहतीला 18 ते 20 एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने सिडकोकडून करंजाडे वसाहतीला पाणीपुरवठा होत आहे, मात्र येथील सेक्टर 6 येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील 150 सोसायट्यांना फटका बसत आहे. परिणामी, रहिवाशांना पाणी समस्याला सामोरे जावे लागत आहे. सिडकोचे सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग डॉ. वीरेंद्र पाटील यांनी सेक्टर 6 येथे जुनी जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तांत्रिक तपासणी सुरू केली असून, लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याने करंजाडे टँकरमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






