अलिबागमध्ये रंगली कराओकेची मैफिल

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमध्ये गुरुवारी (दि.25) सायंकाळी कराओकेच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्या नव्या गाण्यांचा आनंद या मैफीलीतून प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबागच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कराओके स्पर्धेला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्ष शैला पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यवाह संतोष बोर्झे, वाचनालयाच्या ग्रंथपाल रजिता माळवी आदी उपस्थित होते. या करोओके स्पर्धेमध्ये एकूण 40 जणांनी नाव नोंदविले होते. पडताळणी करून 30 स्पर्धकांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सायंकाळी चारनंतर करोओ मैफिलीला सुरुवात झाली. यावेळी वेगवेगळी नवी जूनी गाणी सुमधूर अशा आवाजातून ऐकण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळाला. प्रत्येक गायक आपल्या पद्धतीने करोओकेची मैफील रंगतदार करीत होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला अडीच हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला दीड हजार व तृतीय क्रमांकाला 1 हजार असे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच, दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून विक्रांत वार्डे आणि कला पाटील यांनी काम पाहिले.

Exit mobile version