| पनवेल | प्रतिनिधी |
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे लायन्स सरगम कराओके स्टार 2025 ही कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार दि. 16 मार्च, तर अंतिम फेरी गोखले हॉल येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेसाठी वयोगट- वय 17 पर्यंत, 18 ते 40, 41 ते 60, 61 पासून पुढे आणि फक्त लायन सभासद असे असून, प्रवेश फी रु.500/- आहे. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी संजय गोडसे- 9869347300 आणि सुरभी पेंडसे- 9323674989 यांच्याशी संपर्क करावा आणि गेल्यावर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अध्यक्ष मानदा पंडित यांनी केले आहे.