। अलिबाग । वार्ताहर ।
नुकत्याचा अश्टेदू मर्दानी आखाडा या खेळाची निवड चाचणी स्पर्धा अलिबागमध्ये संपन्न झाली. यावेळी विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल आणि विजयी संघाला ट्रॉफी क्रिडा अधिकारी अंकिता मलेकर यांच्या हस्ते देण्यात आली. सोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कवळे, उपाध्यक्ष संजय गमरे, संघटना सचिव हर्षला शेडगे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तसेच रोहन गुरव, वेदिका कवळे, तनया मणोकर, जिज्ञासा पाटील, सोनू कामी, संचिता पाटील, अनघा पाटील यांनी स्पर्धेत पंचांची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. या स्पर्धेत अलिबागच्या जय शोटोकान कराटे स्पोर्ट अॅकॅडमीला प्रथम क्रमांक पटकाविला तर माणगाव द्वितीय, झिरा तृतीय, व मापगाव संघो चतुर्थ क्रमांक पटकाविला. या विजयी स्पर्धकांची औरंगाबाद येथे होणार्या राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.






