| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद शाळा आक्षी येथे नुकताच कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. जय शोतोकॉन कराटे आणि स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या तर्फे संस्थेचे अध्यक्ष संतोष कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक महिन्याचे कराटे प्रशिक्षण मोफत देण्यात आले. प्रशिक्षक म्हणून निकिता थळे (ब्लॅक बेल्ट) यांनी उत्तम कामगिरी बजावली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष कवळे, प्रशिक्षक निकिता थळे तसेच अलिबाग बीट विस्तार अधिकारी व नागाव केंद्राच्या आदरणीय केंद्र प्रमुखा प्राची राजन ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक ज्योती घरत व उपशिक्षिका सुनिता राठोड यांचे सहकार्य लाभले.







