कर्जतः सात ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

निवडणूक कधी होणार याकडे लक्ष

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहे. पुन्हा नव्याने निवडणूका होईपर्यंत आता या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज असणार आहे.

तालुक्यातील गौरकामत, वदप, नसरापूर, खांडस,अंभेरपाडा, ओलमन आणि नांदगाव या सात ग्रामपंचायती मधील लोक नियुक्त सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. तालुक्यातील गौरकामत आणि वदप या दोन ग्रामपंचायतची मुदत 6 मार्च 2023 रोजी संपली आहे. त्याचवेळी नसरापूर ग्रुप ग्रामपंचायतची मुदत 2 जुलै रोजी संपली आहे. तर खांडस, अंभेरपाडा, ओलमन, नांदगाव या चार ग्रामपंचायतची मुदत 2 जुलै 2023 रोजी संपली आहे. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने त्या सर्व ग्रामपंचायत साठी प्रभागरचना तयार झाली आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक कधी होणार याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागून आहे.

तालुक्यातील या सात ग्रामपंचायतीमध्ये कर्जत पंचायत समिती कडून प्रशासक नेमण्यात आले आहेत. जेणेकरून त्या सर्व सात ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न सुटण्यात अडचणी येणार नाहीत. त्यात गौरकामत ग्रामपंचायतसाठी कर्जत पंचायत समिती मधील अधिकारी आरोग्य विस्तार अधिकारी खराडे यांच्यावर तर वदप ग्रामपंचायती मध्ये प्रशासक म्हणून विस्तर अधिकारी अनिता ढमढेरे आणि नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये विसातर अधिकारी उज्ज्वला भोसले यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी आहे. मोठ्या लोकसंख्येच्या खांडस ग्रामपंचायतीमध्ये विस्तर अधिकारी डी पी राठोड, तर विस्तार अधिकारी सी.डी. पाटील हे अंभेरपाडा ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक असतील. तसेच ओलमन ग्रामपंचायतीमध्ये विस्तार अधिकारी पी.एम. गायकवाड या आणि नांदगाव मध्ये तालुका कृषी अधिकारी चिंतामणी लोकहरे हे प्रशासक असणार आहेत.

Exit mobile version