| नेरळ | प्रतिनिधी |
राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मागे ईडी आणि अन्य केंद्रीय गुप्तचर यंत्रणा यांचा चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. त्याबद्दल मोदी सरकारचा निषेध करण्याबरोबरच सोनिया यांना समर्थन देण्यासाठी कर्जत तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. नेरळ येथील हुतात्मा चौकात काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनची सुरुवात हुतात्मा चौकातील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला तालुका अध्यक्ष शिवाजी खारीक यांनी तर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्याला जिल्हा चिटणीस चंदकांत मांडे यांचे हस्ते पुष्पहार घालून सुरुवात झाली. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात दोन तास बैठा धरणे आंदोलन सुरू केले.
आंदोलनात तालुका अध्यक्ष शिवाजी खारीक, तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत मांडे, प्रमोद राईलकर तसेच तालुका उपाध्यक्ष अरविंद कटारिया, तालुका कार्याध्यक्ष आवेश जुवारी, नेरळ अध्यक्ष असिफ आतार, यांच्यसह तमसील भाई,देविदास मसणे,आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.