86 वर्षांची परंपरा सांगणारे कर्जत गणेशोत्सव मंडळ

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी स्वतःला झोकून देणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 86 वर्षांचे झाले आहे. कर्जत शहरातील नाहीतर ग्रामीण भागातील जनतेला चांगलंय आरोग्य सुविधा देण्याबरोबर आरोग्य क्षेत्रात काम करणारे म्हणून कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काम करीत आहे. तर पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव साजरा करणार्‍या या मंडळाने सामाजिक विषयाचे भान ठेवणारे देखावे गणेशोत्सव काळात भक्तांसाठी सजावटीच्या माध्यमातून पुढे आणले आहेत.

जनार्दन भाऊ जोशी हे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बनले होते. गेली एक तप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आरोग्य रथ कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालय मधील सामान्य रुग्णांचा आधार बनली आहे. रात्री कितीही वाजता आणि कुठेही जायचे असल्यास सागमची रुग्णवाहिका हि सर्वांचा आधार बनलेली आहे. सध्या या मंडळाकडे एकाच रुग्णवाहिका असून समाजातील दानशूर यांनी मंडळाचे काम पाहून रुग्णवाहिका भेट द्यावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

तर मंडळाच्या कार्यालयात गेली चार वर्षे नेत्र चिकित्सा शिबीर महिन्यातून दोनवेळा भरलेली जातात. त्यात ठाणे येथील स्वराली नेत्रालयकडून चार वर्षात असंख्य रुग्णांना रेटिना आणि लेन्सेस माफक दरात देण्याचा उपक्रम सुरु आहे. तर मंडळाकडून मुंबई वरील अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी यांना अभिवादन करण्यासाठी 26/11 रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले जात असून हि परंपरा 10 वर्षे सुरु आहे. यावर्षी मंडळाकडून विविध अकरा प्रकारच्या रक्त तपासण्या करण्याचे शिबीर आयोजित केले आहे. सर्व रक्त तपासण्या महाराष्ट्र शासनाच्या महालॅब कडून केल्या जाणार असून कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि मोहाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाकडून रक्त तपासण्या केल्या जाणार आहेत.तर यावर्षी शालेय विद्यार्थी यांच्यासाठी समूह गायन,चित्रकला आणि कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होत्या.

मंडळाचे 70 हुन अधिक कार्यकर्ते ही कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची खरी देणं असून मंडळाचे अध्यक्ष कोणीही असो.. सर्व इतर राहून काम करीत असतात. विद्यमान अध्यक्ष आधिश गोखले तर सचिव म्हणून मंगेश जोशी आणि खजिनदार म्हणून पंकज शाह हे आपल्या सर्व सहकारी यांच्यासोबत पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Exit mobile version