कर्जतचा पारा 44 अंशांवर

वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद

| नेरळ | प्रतिनिधी |

राज्यातील उष्णतेमुळे सर्वत्र तापमान वाढले आहे. त्याबाबत सरकारकडून उष्णतेबद्दल काळजी घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, (दि.29) एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील तापमान ते 44 डिग्री पर्यंत पोहचल्याचे सर्वांच्या मोबाईलवरून मेसेज फिरत होते. त्यामुळे हा दिवस कर्जत तालुक्यातील सर्वात गरम दिवस ठरला.

कर्जत तालुका येथील प्रदूषण मुक्त वातावरणामुळे हा तालुका फार्म हाऊस तालुका बनला आहे. देशात कर्जत तालुक्याची ओळख फार्म हाऊसचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात या भागातील फार्म हाऊसमुळे वनराई वाढली आहे आणि जंगलदेखील वाढले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात फारशी उष्णता जाणवत नाही. मात्र, यावर्षी राज्यात उष्णतेची लाट पसरली होती. त्यामुळे कर्जत तालुक्यात यावर्षीचे सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. कर्जत तालुक्यात अनेकांच्या मोबाईलवर 44 डिग्री तापमान असल्याचे दिसून येत होते. दुपारी बाराच्या सुमारास कर्जत तालुक्यातील तापमान 41 डिग्रीपर्यंत होते. नंतर दुपारी ते वाढून 42 डिग्री होते. त्यानंतर दुपारी दोन वाजता 43 डिग्री वाढले आणि तीन वाजता कर्जतचे तापमान 44 डिग्रीवर गेले होते. त्यामुळे हा दिवस कर्जत तालुक्यातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. तालुक्यातील सरकारी यंत्रणेकडील तापमान हे 43.8 डिग्री नोंदवले गेले आहे. कर्जत येथील भात संशोधन केंद्रात आजच्या तापमानाची नोंद 43.8 डिग्री नोंदवले गेले असून, ते साधारण 44 डिग्रीच्या आसपास होते. काल कर्जत तालुक्यात तापमान 42 डिग्रीपर्यंत गेले होते.

Exit mobile version