| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातून मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी एकही शववाहिनी उपलब्ध नव्हती. त्यामुळे कर्जत नगरपरिषद यांच्याकडून शववाहिनी खरेदी करण्यात आली असून ती नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मंजूर केलेल्या शववाहिनीचे कर्जत नगर परिषदेकडे हस्तांतरण जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून झाले आहे. त्यामुळे ही शववाहिनी शहरातील मृत व्यक्तीला त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या सेवेत रुजू करण्यात आली आहे. पालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी ही शववाहिका कर्जत नगरपरिषद येथे सेवेत रुजू केली. कर्जत नगरपरिषदेकडे किंवा स्थानिक पातळीवर शववाहिनी नसल्याने शववाहिनी शोधून आणण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र, ही अडचण आता दूर झाली आहे. कर्जत शहरासाठी शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे कर्जत परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची व सुलभ वाहतूक सुविधा मिळणार आहे.
कर्जत नगरपरिषदेकडून शववाहिनी कार्यान्वित
