कर्जत नगरपरिषद कचरामुक्त शहराच्या स्पर्धेसाठी सज्ज

थ्री स्टारचे मानांकन फाईव्ह स्टारसाठी प्रयत्नात
। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत या रायगड जिल्ह्यातील आघाडीचे शहर म्हणून विकसित होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये केंद्र सरकारने देशातील कचरामुक्त शहर म्हणून थ्री स्टार मानांकन मिळविले होते. आता 2022 मध्ये कर्जत नगरपरिषदकडून फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्याचे मानांकन मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, शहरातील कचर्‍याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून दोनदा कचरा उचलणे तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यानं जीपीआरएस यंत्रणेने जोडणे हि सर्व कामे कचरामुक्त शहरासाठी फाईव्ह स्टार मिळविण्यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या माध्यमातून केली जात आहेत.

कर्जत नगरपरिषदेचा कचरा उचलण्याच्या कार्यपद्धतीमुळे देशात बोलबाला झाला होता. 2021 च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कर्जत नगरपरिषदेने मोठी भरारी घेत देशात थ्री स्टार मानांकन मिळविले होते. त्या नामांकनाबद्दल कर्जत नगरपरिषदेला आठ कोटींचे अनुदान केंद्र सरकार कडून मिळाले होते. मात्र 2022 च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आणखी भरारी घेण्यासाठी कर्जत नगरपरिषद सज्ज झाली असून कचरामुक्त शहराच्या यादीत फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी पालिकेने जोरदार तयारी केली आहे. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील आणि आरोग्य निरीक्षक यांचा नवी दिल्लीत सन्मान देखील झाला होता. त्यामुळे आता फाईव्ह स्टार मानांकन मिळवून देशातील गार्बेज फ्री सिटी होण्यासाठी कचरा उचलण्याच्या नेहमीच्या कामात आणखी बदल करण्याचे आणि यंत्रणा हायटेक करण्याचे प्रयत्न कर्जत नगरपरिषदेने सुरु केले आहेत.तसे स्वप्न कर्जत नगरपरिषदेने बघून पालिकेची सर्व यंत्रणा आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या यंत्रणा यांना मदत करण्याचे काम करीत आहे.

आम्ही कर्जत शहराचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी पर्यटनशील आहोत. त्यासाठी आता थ्री स्टार नंतर फाईव्ह स्टार नामांकन मिळवून देशातील कचरामुक्त शहर बनण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी कचरा संकुलात हायटेक बदल करीत असून हे बदल शहराच्या विकासाचा भाग बनू पाहत आहे.

सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद
Exit mobile version