कर्जत: पादचारी पूल होणार निकामी

। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वे वरील कर्जत रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. भिसेगाव-गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल हा रेल्वेच्या नवीन मार्गिकेसाठी तो पूल निकामी करणार आहे.दरम्यान,नवीन मार्गिकेमुळे त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे कडून नवीन पादचारी पूल उभारला जात असून त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

कर्जत या मध्य रेल्वे वरील पुणे एन्डकडे असलेल्या महत्वाच्या रेल्वे स्थानकात असलेला पादचारी पुलाचा एका बाजूचा भाग तोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वे वरील पुणे भागाकडे जाणारी लांब पल्ल्याच्या आणि अन्य गाड्या या कर्जत स्थानकात अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी सर्व गाड्या थांबत असतात. त्यामुळे या कर्जत रेल्वे स्थानकाबाबत विशेष महत्व आहे.या स्थानकात ये जा करणार्‍या गाड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात पनवेल-कर्जत मार्गावरून दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्यांची संख्या वाढली आहे. त्याचवेळी पनवेल मार्गावर आणखी एक मार्गिका टाकली जात आहे,त्यामुळे कर्जत स्थानकात आणखी काही मार्गिकेची भासत असल्याने कर्जत स्थानक नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी जागानिर्माण करण्यात येत आहे.

कर्जत स्थानकात फलाट तीनच्या बाजूला नवीन मार्गिका टाकण्याचे काम मध्य रेल्वे कडून गेली काही महिने सुरु आहे. त्या मार्गिकेमुळे कर्जत रेल्वे स्थानकात आणखी एक मार्गिका निर्माण होणार आहे. पण त्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट तीन मधून बाहेर पाडण्यासाठी असलेले सध्या वापरात असलेल्या या पादचारी पूल काढावा लागणार आहे. मध्य रेल्वेने ही अडचण लक्षात घेऊन कर्जत स्थानकात पुणे शेवटकडे असलेल्या पादचारी पुलाला आणखी एक जोड पूल बनविला आहे. त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल थेट कर्जत स्थानकाच्या बाहेर उतरणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांना त्य्याचा अधिक फायदा होणार आहे. मात्र त्यामुळे नवीन मार्गिकेसाठी जुन्या पादचारी पुलाचा भाग तोडावा लागणार आहे. नवीन पादचारी पुलाचा फायदा अधिक प्रमाणात प्रवाशांना ये जा करण्यासाठी होऊ शकते आणि त्यामुळे या बदलाचे करजतकर स्वागत करीत आहेत.

Exit mobile version