कर्जत प्रीमियर लीगः अनया परी सेव्हन स्टार संघ विजयी

। नेरळ । प्रतिनिधी ।
आ.महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत नगरपरिषद हद्दीतील खेळाडूंसाठी पालिकेतील स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांच्या संकल्पनेतून नगरपरिषद अंडरआर्म प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत शहरातील 500 खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद अनया परी सेव्हन स्टार संघाने जिंकले.

प्रीमियर लीगमध्ये 32 व्यवसायिक संघांमधून 500 खेळाडूंनी सहभाग घेतला. या कालावधीत पोलीस परेड मैदानावर खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेत बडेकर सेव्हन स्टार, डीसीसी,ओमकार दहिवली, कुलदीपक, अनन्या सेव्हन स्टार, स्वामी इलेक्ट्रॉनिक,अभिषेक वॅरियर्स, एससीसी, आर्ष बॉईज, भीमगर्जना मित्र मंडळ, नर्मदा डेव्हलपर्स, मुद्रेकर टायगर, एनके टायगर, जय अंबे भिसेगाव,कर्जत कॅप्टन,साई रक्षण,कर्जत नाईट रायडर्स,4040 वॅरियर्स,आदी संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उदघाटन आ. महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले होते.या स्पर्धेत युवाकांसोबत वैयस्कर क्रीडा रसिकांनी सुद्धा सहभाग घेतला.

स्पर्धेचा अंतिम सामना नायनाट चुरशीचा झाला आणि त्यात सामन्यामध्ये अनया परी सेव्हन स्टार संघाने वन लाईफ संघाचा अंत्यत चुरशीच्या सामन्यात पराभव करून कर्जत प्रीमियर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कुलदीपक दहिवली हा संघ तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला तर कर्जत कॅपिटल हा संघ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.मध्यरात्री नंतर संपलेल्या अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण स्पर्धेचे आयोजक संकेत भासे आणि कर्जत पदाधिकारी तसेच युवासेना पदाधिकारी यांचे हस्ते झाले.

Exit mobile version