। नेरळ । प्रतिनिधी ।
परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान यांच्या निषेधार्थ कर्जतमध्ये आरपीआयचे निवेदन देण्यात आले. परभणी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान करण्यात आला आहे. ही घटना निषेधार्थ असून संविधानाचा अवमान करणार्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी कर्जत आरपीआय यांनी कर्जत येथे प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस प्रशासक यांना निवेदन देत निषेध केला.
संविधानाचा अवमान करणार्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुकावतीने कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अरविंद मोरे, अमर जाधव, राहुल गायकवाड, दिपक भालेराव, किशोर गायकवाड, मनोज गायकवाड, किशोर जाधव, विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गोतारणे, भारतीय बौद्ध महासभेचे बापु गाडे उपस्थित होते.