व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत कर्जत तालुका प्रथम

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व शाळांचा सहभाग

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या सेस विभागाच्या निधीमधून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा राबविण्यात आली. तालुका स्तरावर केंद्र आणि नंतर बीट आणि शेवटी तालुका पातळी अशा स्वरूपात घेण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा जिल्हा स्तरावर खालापूर तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आल्या. या जिल्हास्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत कर्जत तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला.

रायगड जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत व्यक्तिमत्व विकास व क्रीडा स्पर्धेतील क्रीडा तालुका स्तरावर प्रथम आयोजित करण्यात आल्या. तालुका स्तरावर, प्रथम केंद्र स्तरावर आणि केंद्र स्तरावरील विजेत्या यांच्या बीट स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. बीट स्तरावरील विजेत्यांना तालुका स्तरावर संधी देण्यात आली आणि तालुक्यात प्रथम आलेल्या संघ तसेच वैयक्तिक सहभागी विद्यार्थी यांना जिल्हा स्तरावर संधी मिळाली. जिल्हा स्तरावरील व्यक्तिमत्व विकास आणि क्रीडा स्पर्धा खालापूर तालुक्यातील वडगाव येथे जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी या जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास आणि क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. पुनीता गुरव यांच्या पुढाकाराने तीन दिवसीय व्यक्तिमत्व आणि क्रीडा स्पर्धेत क्रीडा स्पर्धे लंगडी खेळणे, लगोरी खेळणे, दोरी उडी मारणे, बेचकीने नेमी धरणे असे ग्रामीण आणि लोप पावत चाललेल्या क्रीडा प्रकार यांना पुन्हा चालना देण्यासाठी या क्रीडा प्रकार यांचा समावेश झाला होता. तर व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये पथनाट्य आणि शिल्प बनवणे या स्पर्धांचा समावेश होता.

कर्जत तालुक्याने या जिल्हास्तरीय स्पर्धेत मोठी कामगिरी करताना बहुसांख्य क्रीडा प्रकारात यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्हा व्यक्तिमत्व विकास आणि क्रीडा स्पर्धेत कर्जत तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला आणि चॅम्पियन ठरला. स्पर्धेतील यशाबद्दल रायगड जिल्ह्याचे वतीने कर्जत तालुक्याला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली. जिल्हा शिक्षण अधिकारी पुनीत गुरव यांचे हस्ते कर्जत तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौन्ड यांनी क्रीडा सामनावयक समीर येरुणकर तसेच, आपल्या शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांच्यासोबत स्वीकारला.

Exit mobile version