कर्जत तालुक्याचा निकाल 95.78 टक्के

49 शाळांपैकी 24 शाळांचे निकाल 100 टक्के
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात 49 माध्यमिक शाळा असून, त्यातील 24 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर तालुक्याचा निकाल 95.78 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी 3020 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यानंतर मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 2991 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली होती. शुक्रवार, दि. 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल परीक्षा मंडळाने जाहीर केला असून, त्यात 2865 विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यात तब्बल 797 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण, तर 1165 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, 754 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीमध्ये आणि 149 विद्यार्थी हे पास झाले असून, कर्जत तालुक्याचा निकाल 95.78 टक्के निकाल लागला आहे.

कर्जत तालुक्यातील 49 शाळांपैकी तब्बल 24 शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी यशस्वी झाल्याने त्या 24 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये कर्जत शहरातील शारदा मंदिर, स्वातंत्र्यसैनिक डोंबे निकेतन, विद्या विकास मंदिर कर्जत तसेच नेरळ विद्या विकास मंदिर, आंबिवली माध्यमिक विद्यालय, गुंडगे येथील गुड शेफर्ड कॉन्व्हेन्ट स्कूल,भिमान्यी विद्यालय एनाचीवाडी, हजी लियाकत इंग्लिश स्कूल नेरळ, माथेरान व्हॅली वंजारपाडा, भडवल येथील शेंडे पाटील विद्यालय, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पाषाने, व्ही के कोठडी स्कूल नेरळ, दत्ता सामंत विद्यालय वाकस,तर कशेळे येथील द्यानानुभव हायस्कूल, काळभैरव विद्यालय किरवली, जय अंबे भिसेगाव,प्रभाकर पाटील शाळा बीड बुद्रुक, सरस्वती विद्या मंदिर माथेरान यांच्यासह शासकीय आश्रमशाळा चाफेवाडी, भालीवडी, पिंगळस या शाळांचा समावेश आहे.

तर कर्जत तालुक्यातील नेरळ येथील आर्या इंग्लिश स्कुल 98.90, खांडपे येथील गीता विद्यालय -95.23, नानासाहेब मोरे हायस्कूल शेलू – 97.87, नेरळ विद्या मंदिर नेरळ -84.25, अंग्लो उर्दू स्कूल – 97.65, प्रगती हायस्कूल कळंब – 93.33, गौलवाडी माध्यमिक विद्यालय 96.82, एम बी राऊत कशेळे 97.41, शासकीय आश्रम शाळा पाथरज 98.30, श्री गजानन विद्यालय कडाव 90.09, अभिनव प्रशाला कर्जत – 98.35, जनता विद्यालय दहीवली, 85.52, भाऊसाहेब राऊत चिंचवली डीकसळ 92.78, कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूल कर्जत 98.34, खांडपे द्यान मकरंद 96.36,स्वामी विवेकानंद 78.57, मांडवणे विद्यालय – 68.18, श्रमजीवी पोषीर 87.61, नेरळ विद्या भवन धामोते – 98.50, प्रभाकर पाटील विद्यालय सुगवे – 96.77, प्रभाकर पाटील विद्यालय – 89.26 टक्के असे निकाल जाहीर झाले आहेत.

Exit mobile version