। नेरळ । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादीचे कर्जत तालुका उपाध्यक्ष पाषाणे येथील जनार्दन म्हसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला.
राष्ट्रवादीचे कर्जत तालुका उपाध्यक्ष कळंब जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते जानंदर म्हसकर यांनी आपले सहकारी ब्रोशन पाटील आणि समीर निचिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्या सर्वांचे भाजपात स्वागत राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी करण्यात आले.
त्यावेळी भाजप रायगडचे युवक नेते किरण ठाकरे, भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष सचिन म्हसकर,भाजप ओबीसी मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष दशरथ वेहले, कळंब जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष संदीप पालांडे आदी उपस्थित होते. म्हसकर यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का समजला जात आहे.