कर्जतला नारायण डामसे यांनी नेतृत्व दिले

आ.जयंत पाटील यांचे गौरोद्गार
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील कार्यकर्ता आपल्या मधील नेतृत्वगुण यांच्यामुळे तालुक्याला एक कणखर नेतृत्व मिळाले आहे असे गौरोद्गार शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी काढले. रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती आणि आदिवासी समाजाचे कार्यकर्ते नारायण डामसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे वतीने रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी कर्जत तालुका विकासाच्या वाटेवर असून शेकापच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला सर्व पक्षातील कार्यकर्ते बघून आनंद वाटला. सर्व राजकीय पक्षात अशी प्रसंगाला एकत्र येण्याची पद्धत निश्‍चितच चांगली आहे. त्यात नारायण डामसे यांचे कर्तृत्व देखील महंतांचे असून ते सर्वांना सोबत घेऊन जात असल्याने त्यांचे नेतृत्व गुण दिसून येत आहेत असे म्हणाले. या सोहळयाला शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जयंत पाटील, कर्जतचे आ.महेंद्र थोरवे, शिक्षक मतदारसंघाचे आ.बाळाराम पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सीमा पेमारे, कर्जत पंचायत समितीच्य उपसभापती जयवंती हिंदोळा, भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, तालुका सरचिटणीस राजेश भगत, शेकाप खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, कर्जत तालुका प्रभारी चिटणीस आणि जिल्ह्याचे खजिनदार श्रीराम राणे, शेकाप युवक मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव भगत, बाजार समितीचे संचालक रवींद्र झांजे, पंचायत समिती सदस्य कविता ऐनकर, सरपंच दत्तात्रय पिंपरकर, युवक तालुका पदाधिकारी महेश म्हसे, विभागीय अध्यक्ष पांडुरंग बदे आदी उपस्थित होते.

Exit mobile version